वाहनचालकांकडून पाच महिन्यांत ८३ लाख दंड वसूल

वाहनचालकांकडून पाच महिन्यांत ८३ लाख दंड वसूल

नसरापूर, ता.२३ : पुणे-सातारा महामार्गावर एप्रिल ते ऑगस्ट २०२३ या पाच महिन्याच्या कालावधीत महामार्ग सुरक्षा पथकाच्या कारवाईत बेशिस्त वाहन चालकांकडून ८३ लाख १५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे.
पुणे-सातारा महामार्गावर सारोळे महामार्ग पोलिस मदत केंद्रांतर्गत सारोळा ते शिंदेवाडी (ता.भोर) या हद्दीत महामार्ग वाहतूक सुरक्षेचे काम केले जाते. यामध्ये बेशिस्त भरधाव वाहन चालक, वाहतुकीचे नियम न पाळणारे वाहन चालक,अल्पवयीन चालक, प्रमाणाबाहेर बोजा वाहणारे वाहन चालक आदी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते यासाठी महामार्ग वाहन तपासणी करण्यात येते यासाठी महामार्ग वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक व किमान दहा कर्मचारी रोज काम करत असतात.

माहिती अधिकार कार्यकर्ते दिलीप फडके यांनी सांगितले कि, या कारवाईत अनेक वाहनांवर दोष नसताना निव्वळ त्यांनी चहापाणी दिले नाही म्हणून नंबरचा फोटो काढून कारवाई केली जाते. चहापाणी दिले गेले तर दोष असलेली वाहने देखील दंडातून सोडली जातात. मी स्वतः याबाबत अनुभव घेतल्यावर याबाबत मागील वर्षी एप्रिल २०२३ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत झालेल्या कारवाईची व वसूल केलेल्या दंडाची माहिती मागवली होती. ती १६ मे २०२४ रोजी मला मिळाली. या माहिती आधारे पाच महिन्यात ५ हजार ८९६ केसेस करत ८३ लाख रुपये दंड वसुल केला आहे.

पोलिसांनी अवैध मार्गाचा वापर केला नाही व दोषी वाहनचालकाकडूनच दंड वसूल केला तर दंडाची रक्कम अजून वाढू शकते व कोणत्याही परिस्थितीत दंड चुकत नाही म्हटल्यावर वाहन चालक देखील नियमांचे पालन करुणच वाहन चालवेल असा मला विश्वास आहे. मात्र एवढीच रक्कम किंवा या पेक्षा थोडी कमी रक्कम कोणाच्यातरी खिशात जात आहे त्यामुळे शासनाचा तोटा होत आहे हे स्पष्ट होत आहे.
- दिलीप फडके, माहिती अधिकार कार्यकर्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com