नसरापुरात कडधान्य खरेदीसाठी गर्दी

नसरापुरात कडधान्य खरेदीसाठी गर्दी

नसरापूर, ता.१० : नसरापूर (ता. भोर) येथे पावसाळ्याच्या तोंडावर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कडधान्य बियाणांच्या खरेदीसाठी सोमवारी (ता.१०) कडधान्य बाजारात गर्दी केली होती. यावेळी व्यापाऱ्यांपेक्षा थेट शेतकऱ्यांकडून खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली.
यंदा पाऊस वेळेवर सुरू झाला असून, थोड्या दिवस उघडीप मिळताच शेतकरी खरिपाची पेरणी करण्यास सुरुवात करणार आहेत. यासाठी नसरापूर येथे रविवारच्या बाजारात शेतकरी ग्रामस्थ व महिला कडधान्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणतात. पेरणी करण्यासाठी या बाजारात नसरापूरसह राजगड तालुका, भोर भागातील शेतकरी देखील आवर्जून कडधान्य खरेदीसाठी बाजारात येत असतात. या बरोबरच सर्वसामान्य नागरिक देखील घरातील भाजीसाठी कडधान्य यावेळी खरेदी करतात आजच्या या बाजारात विक्रेत्यांबरोबरच खरेदीदारांची गर्दी झाली होती.
व्यापारी व दलाल नसल्याने थेट शेतकऱ्यांकडून योग्य दरात कडधान्य या ठिकाणी मिळतात शिवाय त्यामध्ये भेसळ देखील नसते. त्यामुळे येथे खरेदीला शेतकरी पसंती देतात.

कडधान्य.... किंमत (रुपयांत)
उडीद ............१०० ते १२०
मूग............१२०
हरभरा............६५ ते ७०
धने............१५०
वाघा घेवडा............१००
वरुण घेवडा............१००
चवळी............८०
काळा घेवडा............१००
पांढरा घेवडा............१००
सोयाबीन............५५ ते ७०
गावरान वाटाणा............२००

यंदा पावसाने चांगली सुरुवात केली आहे. चांगली उघडीप दिली तर पुढील बाजारात देखील मोठ्या प्रमाणात कडधान्य विक्रीस येण्याची शक्यता आहे.
-सुनील शेटे, शेतकरी भोंगवली

04273

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com