पाच लाख विसार घेऊन 
खरेदीखतास टाळाटाळ

पाच लाख विसार घेऊन खरेदीखतास टाळाटाळ

नसरापूर, ता. १० : जमीन विक्री करण्याचे ठरवून खरेदीदारांकडून पाच लाख रुपये विसार घेऊन नंतर विक्रीस टाळाटाळ करणाऱ्या पती- पत्नीवर खरेदीदाराच्या तक्रारीनुसार फसवणुकीचा गुन्हा राजगड पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
याबाबत सुषमा विनायक शिंदे (वय ३८, रा. करंजावणे, ता. राजगड) यांनी तक्रार दिली असून, त्यानुसार गीतांजली सुरेश पांगारे व त्यांचे पती सुरेश लक्ष्मण पांगारे (दोघेही रा. सांगवी खुर्द, ता. भोर) यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा राजगड पोलिसांनी दाखल केला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेगाव (ता. भोर) येथील गट क्रमांक ३६६मधील गितांजली सुरेश पांगारे यांच्या हिश्श्याचे ५.११ आर क्षेत्र गीतांजली व त्यांचे पती सुरेश पांगारे यांनी सुषमा विनायक शिंदे यांना १६ लाख ३५ हजार रुपयांना विक्री करण्याचे ठरवले होते. त्यासाठी १२ नोव्हेंबर २०२० रोजी विसार पावती करून पाच लाख रुपयांचे तीन धनादेश गीतांजली पांगारे यांच्या नावे दिले व ते पैसे गीतांजली यांच्या खात्यावर जमा देखिल झाले. त्यानंतर कागदपत्रांची पुर्तता करून दोन महिन्यांत खरेदीखत करून देतो, असे पांगारे पती- पत्नीने सांगितले. दरम्यान, शासकीय मोजणीसाठी सप्टेंबर २०२२ मध्ये शिंदे यांनी पांगारे यांना अजपण २० हजार रुपये दिले. त्यानंतर बराच कालावधी झाला तरी पांगारे यांनी खरेदीखत करून न देता टाळाटाळ करून लागले. तेव्हा सुषमा शिंदे यांचे सासरे, सासू व पती यांनी व्यवहारातील मध्यस्थ नामदेव तानाजी झेंडे, निवृत्ती तानाजी झेंडे व दशरथ बबन धावले यांना घेऊन पांगारे यांच्या घरी दोन वेळा बैठक घेऊन याबाबत विचारणा केली. त्यावर पांगारे यांनी खरेदीखत करून देतो, असे सांगितले; परंतु प्रत्यक्षात टाळाटाळच करू लागले. त्यांना खरेदीखत करून द्या, अथवा आमचे ५ लाख २० हजार रुपये परत द्या, असे सांगितल्यावर देखिल त्यांनी व्यवहार पूर्ण केला नाही व पैसे देखिल परत दिले नाही.
राजगड पोलिसांनी गीतांजली सुरेश पांगारे व सुरेश लक्ष्मण पांगारे यांच्या विरुद्ध फसवणूक व विश्वासाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय सुतनासे पुढील तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com