कोंढणपूर फाटा येथून 
मोटारसायकलची चोरी

कोंढणपूर फाटा येथून मोटारसायकलची चोरी

नसरापूर, ता. ८ : खेड शिवापूर (ता. हवेली) येथील कोंढणपूर फाटा येथून चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची तक्रार दुचाकी मालकाने राजगड पोलिस ठाण्यात केली आहे.
बिंदू भीमसिंह राठोड (वय २८, रा. सध्या खेडशिवापूर, माऊली वजनकाट्यामागे; मूळगाव मानाखोरी, जि. आग्रा, मध्य प्रदेश) यांचा दुचाकीवर फिरून प्लास्टिक खुर्च्या विकण्याचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांनी खेडशिवापूर येथे भाड्याने खोली घेतली आहे. ५ जुलै रोजी रात्री ९ वाजता त्यांनी त्यांची अंदाजे ३० हजार रुपये किमतीची एच एफ डीलक्स मोटारसायकल (क्र. एम.एच. ७० एम.सी. ७५२१) खोलीसमोर लावली होती. मात्र, रात्री ९ ते रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरट्याने त्यांची दुचाकी चोरुन नेली. दुचाकीच्या पुढील भागात भगव्या रंगात ‘जय बाडी माता दी’ असे लिहिले असून, हिरव्या रंगात इंग्रजीमध्ये ‘अरविंद’ असे लिहिले आहे. अशा वर्णनाची मोटारसायकल कोणास आढळल्यास राजगड पोलिस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास पोलिस हवालदार प्रमिला निकम करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com