डायनाने परतविला तीन तरसांचा हल्ला
नसरापूर, ता ११ : दीडघर (ता. भोर) येथील फार्म हाऊसवर पिटबुल जातीच्या डायना नावाच्या मादी श्वानाने तीन तरसांशी लढा दिला व प्रतिहल्ला करून पिटाळून लावले. तिने दिलेल्या झुंजीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मात्र, तरसांशी मुकाबला करताना ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या घटनेतून
तिने दाखविलेल्या मालकावरील निष्ठेची पंचक्रोशीत चर्चा होत आहे.
दीडघर येथे डॉ. विराज सूर्यवंशी यांच्या फार्म हाऊसवर ही घटना घडली. शेताच्या आवारातील छोट्या जनावरांची शिकार करण्याच्या हेतून झाडीतून उतरलेल्या तरसांनी डायनावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी डायनाने प्रतिहल्ला चढवून एक तरसाच्या गळ्याला चावा घेतला. बाकीचे दोन तरस तिच्या कानावर व शेपटीवर हल्ला करत होते. रक्तबंबाळ अवस्थेतही तिने तरसाच्या गळ्यावरील पकड सोडली नाही. मात्र, तिच्या धैर्यामुळे शेतातील जनावरे व कुटुंब सुरक्षित राहिले.
झुंजीचा आवाज ऐकून शेतमालक व तेथील केअरटेकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काठीच्या सहाय्याने तरसांना हकलून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन तरसांनी धूम ठोकली तर डायनाने चावा घेतलेला तरसही गंभीर जखमी होऊन पळून गेला. तो मृत्युमुखी पडण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, डायना गंभीर जखमी झाली असून, तिने एक कान, शेपटी व दुसऱ्या कानाचा काही भाग गमावला आहे. शेतमालक डॉक्टर असल्याने त्यांनी तत्काळ उपचार साहित्य मागवून या श्वानावर प्राथमिक उपचार केले व शिरवळ पशू महाविद्यालयाचे डॉक्टर अजित माळी यांनी तिच्यावर तातडीचे उपचार करून त्याचे प्राण वाचवले.
05792
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.