सातारा महामार्गावरील प्रवास म्हणजे शिक्षा

सातारा महामार्गावरील प्रवास म्हणजे शिक्षा

Published on

नसरापूर, ता. २६ : दीपावलीच्या सुट्ट्या संपवून पुन्हा शहराकडे येणाऱ्यांना रविवारी (ता. २६) वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पुणे-सातारा महामार्गावर कापूरव्होळ, खेड शिवापूर टोलनाका, चेलाडी येथे वाहतूक संथ होती. कोंडीमुळे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. यामुळे प्रवाशांचे दीड ते दोन तास वाया जात होते.
सातारा महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे प्रवाशांना एकप्रकाची शिक्षाच ठरत होती.
भोर तालुक्याच्या हद्दीत सारोळा ते कात्रज बोगदा या अंतरात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे संथगतीने चालू आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या तीन पदरी लेन चालू न शकल्याने वाहनांची वाहतूक संथ दररोज संथ होते.

वाहतूक कोंडीची कारणे
- सातारा महामार्गावर जागोजागी रस्त्याची झालेली दुरवस्था
- दरवर्षी वाहनांची वाढणारी संख्या व रस्त्याची स्थिती जैसे थे
- अनेक ठिकाणी रस्त्याची कामे संथगतीने
- अपुऱ्या कामांमुळे वाहतूक संथ
- दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या
- अरुंद रस्त्याच्या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्याकडून वाहतुकीवर नियंत्रण नाही
- उड्डाण पुलांची संख्याअधिक असूनही वाहतुकीच्या नियोजनाचा अभाव

संभाव्य उपाययोजना
- महामार्गाच्या सेवा रस्त्यांची दुरुस्ती झाल्यास वाहतूक सुरळीत राहील
- काम चालू असलेल्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डनची आवश्‍यकता
- रस्त्यावरील उड्डाणपलाचे किंवा दुरुस्तीचे काम निर्धारित वेळेत व्हावे
- शिवापूर टोल नाक्यावर गर्दीच्या वेळी जास्तीच्या लेनची गरजेचे
- वाहतूक नियंत्रण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढवणे आवश्यक
- गर्दीच्या वेळी पर्यायी मार्गाने वाहतूक करण्यास प्रवाशांना आवाहन करणे
- साताऱ्याकडून येणाऱ्या प्रवाशांना पुण्यात येण्यासाठी हडपसर कापूरव्होळवरून सासवड मार्गे जाण्यास सांगणे


05904

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com