जिल्ह्यातील ३८ विद्यार्थ्यांचे प्रकल्प राज्यस्तरावर

जिल्ह्यातील ३८ विद्यार्थ्यांचे प्रकल्प राज्यस्तरावर

Published on

खेड शिवापूर, ता. १७ : खोपी (ता. भोर) येथे गुरुवार (ता. १३) ते शनिवार (ता. १५) या कालावधीत पार पडलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून सन २०२३-२४ या वर्षातील १४ व सन २०२४-२५ वर्षातील २४ असे मिळून ३८ विद्यार्थ्यांचे प्रकल्प राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवडले गेले.
पुणे जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड २०२३-२४ व २०२४-२५ या दोन वर्षाचे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन खोपी येथील फ्लोरा इन्स्टिट्यूट येथे पार पडले. या विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील ४२० शाळांनी सहभाग घेतला होता. उद्‌घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून सीओईपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शन पाहण्यासाठी खुले करण्यात आले. यावेळी इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ.अतुल पडळकर, जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी विराज खराटे, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुनील गायकवाड, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रावसाहेब चौधरी व संजीव वाखारे, विनायक मांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पांच्या मूल्यांकनासाठी शास्त्रज्ञ सुनील भास्कर (एन आय एफ नवी दिल्ली) व तज्ञ परीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती त्यांनी निवड केलेल्या प्रकल्पाच्या विद्यार्थांचा गौरव करण्यात आला. बक्षीस वितरणास प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर उपस्थित होते. यावेळी राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून माधुरी धुमाळ यांनी आभार मानले.

राज्यस्तरासाठी निवडले गेलेले विद्यार्थी व प्रकल्प
सन २०२३-२४ मधील प्रकल्प : आगम साने : बसमधील प्रवासी मोजणारा स्कॅनर, श्रीतेज कलशेट्टी : डास निर्मुलन यंत्र, गायत्री पोरे : मुलांच्या आरोग्यासाठी सुरक्षा मशिन,आदित्य देशमुख : अपंग, वृद्धांसाठी आधुनिक किचन, प्रतीक्षा आने : आधुनिक हेल्मेट, ज्ञानेश्वर गवळी : हलका मेटल ट्रे, सोहम शिंगाडे : फळे अच्छादित करणारे मशिन, अनिशा शिंदे : आधुनिक बेंच, आदिती गवारी : पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करणारे मशिन, याशिका ओझा : बियाणे पेरणारे मशिन, गीता धनवडे : गर्भवती, वृद्ध रुग्णांसाठी आधुनिक डिव्हाईस, शार्दूल देशिंगे : सुरक्षित प्रेशर कुकर, प्रियल पगारिया : सुई मुक्त इंजेक्शन, मंथन धावसकर : स्मार्ट डोअर लॉक.

सन २०२४-२५ : मुबारक इनामदार : ऊस कट करणारे मशिन, अभिजित गावडे : ड्रीप एक्सट्रँक्शन, रुद्रांश सावंत : डिजिटल इंधन फ्लो मिटर, दीक्षा जगताप : पोर्टेबल स्टीक होल्डर, कौस्तुभ खोपडे : जड वस्तू वाहतुकीस मदत करणारी पद्धत, मैत्रेयी दडपे : पार्टी ऑफ बेबीज, धैर्यशील खैरे : ॲटोमॅटिक खते देणारे मशिन, स्वानंदी कुलकर्णी : बटर स्टीक, सोहम गिलबिले : डस्ट पॅन वुईथ ब्रुमक्लिनर, प्रणव वंजारी : ॲडजस्टेबल सॅक बेल्ट, ईश्वरी कळसकर : पेंटिंग मशिन, यशराज रासकर : जहाजामधील दूध वाहतूक, उदय मडवाले : ॲडजेस्टेबल फुटरेस्ट, कृष्णा थोरात : जंतू शोधक, वेदांती वाबळे : आधुनिक सुरक्षाद्वार, सिद्धी पडवाल : दुचाकीवर मुलांसाठी सुरक्षा पट्टा, ओंकार वाडेकर : स्मार्ट फाइल, देविका तड : स्मार्ट सील मशिन, अर्णव भुसारी-देवयानी गडाख : एसी प्युरिफायर, गीता धनावडे : वेदनारहित सायकल सिट, श्रेयांश कुंभारकर : मोटारसायकल स्वयंचलित स्टॅण्ड स्लायडर, स्वराज कड : आधुनिक डंपिंग ट्रॉली, समीक्षा चोरघे : अंब्रेला वारपिंग मशिन.

05980

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com