नसरापुरातील दवाखान्याकडे असुविधांमुळे पशुपालकांची पाठ
किरण भदे : सकाळ वृत्तसेवा
नसरापूर, ता. १८ : येथील (ता.भोर) सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात अपुरे कर्मचारी व अपुरे पशुधन विकास अधिकारी आहेत. त्यामुळे एका विकास अधिकाऱ्याकडेच नसरापूरसह किकवी दवाखान्याचा कार्यभार आहे. यामुळे त्यांना सेवा देण्यावर मर्यादा येतात. दोन्ही दवाखान्यांत असुविधांचे प्रमाण अधिक आहे. प्रवेशद्वाराजवळील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे
पशुपालक पशुधनास घेऊन येण्यास टाळत असल्याचे सध्याचे विदारक चित्र आहे.
नसरापूर पशुवैद्यकीय दवाखान्याअतंर्गत नसरापूर, देगाव, नायगाव, खडकी, उंबरे, कामथडी या सहा गावांत सेवा पुरवली जाते. या गावांत लहानमोठे असे असे १२२५ पशुधन आहे यासाठी एक पशुधन विकास अधिकारी, एक परिचर व एक व्रणोपचारक अशी तीन पदे मंजूर आहेत. परंतु येथील पशुधन विकास अधिकारी पद रिक्त असल्याने किकवी येथील पशुधन विकास अधिकारी येथे आठवड्यातील दोन दिवस सेवा देत असतात. परिचरपद देखील रिक्त आहे. फक्त एक व्रणोपचारक येथे सेवेस उपलब्ध आहेत. यामुळे येथे पूर्णक्षमतेने सेवा दिली जात नाही.
यांची आहे गरज
- पशुवैद्यकीय दवाखन्याचा परिसर स्वच्छ व सुविधायुक्त
- पशुपालकांना थांबण्यासाठी सुविधा
- पावसाळ्यातील चिखल न होण्यासाठी सिमेंटकाँक्रीटीकरण
- पूर्णवेळ पशुधन विकास अधिकाऱ्याची नेमणूक
- एक्स रे मशिन
-शस्त्रक्रिया सुविधा होण्याची आवश्यकता.
- फिरते पशुवैद्यकीय पथक कार्यान्वित होणे
दृष्टिक्षेपातील दवाखाना
- कार्यक्षेत्रातील गावांत वध्यंत्व निर्मुलन मोहीम
- विविध आजारानियंत्रणासाठी दरवर्षी लसीकरण
- नसरापूर अंतर्गत १६३० व किकवी कार्यक्षेत्रात २४९९ औषधोपचारांची नोंद आहे.
कार्यक्षेपातील पशुधन
१२२५...नसरापूर
२४९९........किकवी
कालावधी १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतची स्थिती
पशुपैदास सुधारणा--
कृत्रिम रेतन संख्या............५२६
वांझ तपासणी............१९२
गर्भधारणा तपासणी............६६३
लसीकरण
३२६०............लाळ्या खुरकूत
१६५२............फऱ्या-घटसर्प
१९९५............लंपी
७६८........पीपीआर/ईटी (शेळी,मेंढी)
मागील वर्षात प्रमुख पशुरोग
मिल्क फिव्हर
कँटसिस
लेमनेस
मस्टिसिस गोचिड ताप
चारा व वैरण विकास
- अंतर्गत१४३ शेतकऱ्यांना एकूण ४०० किलो बियाणांचे वाटप
- २३ हेक्टर क्षेत्रावर चारा उत्पादनास चालना
रिक्त पदे
किकवी.......... १ परिचर
नसरापूर ........१ पशुधन विकास अधिकारी, १ परिचर.
कार्यक्षेत्रातील गावागावांत लाळखुरकत, लंपी, घटसर्प-फऱ्या व शेळ्यांसाठी आंत्रविशार याचे लसीकरण केले जाते. गंभीर आजाराांत परोपजीवी, गोचिडताप, डिस्टोक्रिया, रुमेनोटाँमी, फाँस्फरस डिफीशिएन्सी या आजारावर उपचार केले जातात. पशुंच्या शस्त्रक्रियेसाठी शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तर छोट्या शस्त्रक्रिया गोठ्यामध्येच केल्या जातात. पशुपालकांनी वेळेत संपर्क साधून जनावरांवर उपचार करून घ्यावेत.
- ऋषिकेश पालवे, पशुधन विकास अधिकारी
05978
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

