हातवे जळीतग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात

हातवे जळीतग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात

Published on

नसरापूर, ता. १९ : हातवे बुद्रुक (ता.भोर) येथे गॅस सिलिंडरच्या गळतीने घर जळून खाक झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या गुरव कुटुंबाला या संकटातून सावरण्यासाठी समाजातील विविधस्तरातील नागरिक व मान्यवरांकडून मदतीचा हात देण्यात आला आहे.
हातवे येथील अंगणवाडी शिक्षिका श्रीमती सुनीता नंदकुमार गुरव यांच्या घरातील स्वयंपाकघरातील सिलिंडरची गळती झाल्याने मंगळवारी (ता. १६) सायंकाळी अचानक घरास आग लागली. यामध्ये त्यांच्या घरासह घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले, अन्नधान्य जळून गेले आहे. गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन उडाल्याने पत्रा देखील फाटला आहे तर लोखंडी अँगल उष्णतेने वाकले आहेत, घरातील फरशी फुटली आहे. साधारणतः: १५ ते १८ लाखांचे नुकसान झाले असून या गरीब महिलेवर हा मोठा आघात झाला आहे. या संकटातून सावरण्यासाठी अनेकांनी त्यांची भेट घेऊन त्यांना मदतीचा हात दिला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी भेट देऊन त्यांना साधारण तीन महिने पुरेल एवढा किराणामाल व धान्यसाठा दिला आहे, शिवाय घराच्या दुरुस्तीसाठी अजून काही मदत लागणार असेल तर देण्याची तयारी दाखवली आहे व नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश राजगुरू, विजय राजगुरू, गावच्या पोलिस पाटील राजश्री जामदार, अभिषेक राजगुरू, अतुल नाक्ती, शुभम थिटे, अजय थिटे, ओंकार थिटे, आकाश गुरव, बाळू राजगुरू व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिंदे यांच्या मदती बरोबरच या हातवे गावचे नागरिक व भोरचे माजी सभापती लहुनाना शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विशाल कोंडे, शिवसेनेचे सचिन बांदल, युवराज पुजारी यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी भेट देऊन रोख आर्थिक मदत केली तर संस्था व सामुहीक ग्रुपमध्ये जननीआई देवस्थान ट्रस्ट भिलारेवाडी वतीने रोख मदत, स्वामीसमर्थ व्हॉट्सॲप ग्रुप भोर संतोष कदम यांच्या वतीने किराणामाल, परिसरातील अंगणवाडी शिक्षकांच्या ग्रुपच्या वतीने किराणा माल, अमृतेश्वर कला महाविद्याल विंझरचे प्राध्यापक नितीन मोकाशी यांच्या वतीने रोख व कपड्यांची मदत केली गेली आहे तर भुरुक गॅस एजन्सी वेल्हे (ता. राजगड) यांच्या वतीने मालक शंकरराव भुरुक यांनी गॅस सिलिंडर सहित संपूर्ण गॅसजोड देण्यात आले.

6061

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com