ग्रामसमृद्ध पंचायतराज अभियान ही लोकचळवळ
नसरापूर, ता. २२ ः ‘‘मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायतराज अभियान ही लोकचळवळ आहे. त्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी सहभागी होऊन गावचा सर्वांगिण विकास साधावा,’’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी वरवे बुद्रुक (ता. भोर) येथील ग्रामस्थांना केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी शनिवार (ता. २०) वरवे बुद्रुक येथे भेट देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने चाललेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. तसेच, मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध अभियानांतर्गत चाललेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत प्रकल्प संचालक शालिनीताई कडू व गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट उपस्थित होते. यावेळी वरवे बुद्रुकचे ग्रामविकास अधिकारी अभय निकम व सरपंच राणी संतोष शेटे व उपसरपंच नागेश हिरामण चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांच्या हस्ते शालेय संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी गावातील विविध कामांचा आढावा घेतला.
यावेळी सरपंच राणी शेटे, उपसरपंच नागेश चव्हाण, सदस्य सुवर्णा माने, धनश्री चव्हाण, बहिरदेव देवस्थानचे अध्यक्ष देवेंद्र मोरे, सदस्य सुधाकर मोहिते, हरिदास काळाणे, बचत गट प्रेरिका मालन चव्हाण, रूपाली केदारे, रेश्मा चव्हाण, योगेश जाधव, सुषणा भोरडे, दत्तात्रेय कामठे व ग्रामस्थ उपस्थित होते.
06071

