‘गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घरे मिळण्यासाठी आमचा लढा’

‘गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घरे मिळण्यासाठी आमचा लढा’

Published on

नसरापूर ता. २७ : गिरणी कामगारांच्या १४ संघटना मिल मजदूर संघ संयुक्त लढा समितीच्या नावा खाली एकत्र आल्या आहेत. आमचा मराठी गिरणी कामगार आम्ही मुंबई मधून हद्दपार होऊ देणार नाही. शेलू व वांगणी येथे घरे न घेता गिरणी कामगारांना मिलच्या जागेवर मुंबईमध्येच घरे मिळण्यासाठी आमचा लढा असून तो आम्ही यशस्वी करणारच, अशी ग्वाही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी दिली.
गिरणी कामगार संयुक्तलढा समितीच्या वतीने भोर व राजगड तालुक्यातील गिरणी कामगारांची संयुक्त सभा नसरापूर येथे घेण्यात आली. त्या सभेत देसाई बोलत होते. याप्रसंगी उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, सचिव शिवाजी काळे, मुंबई शाखा समन्वयक उज्ज्वला भगत, सर्व श्रमिक संघाचे अनंत मालप, गिरणी कामगार सेनेचे सत्यवान उभे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे,ज्ञानेश्वर शिंदे, उपजिल्हा प्रमुख शैलेश वालगुडे, भोर तालुकाप्रमुख दशरथ गोळे, भरत साळुंके,राजगड तालुकाप्रमुख उमेश नलावडे, अंकुश चोरघे, युवा तालुकाप्रमुख अनिकेत शिंदे, उपसंघटक सोमनाथ बोडके, महिला आघाडी प्रमुख निशा सपकाळ आदी मान्यवर व मोठ्या संख्येने गिरणी कामगार यावेळी उपस्थित होते.
बजरंग चव्हाण म्हणाले की, १९९१ च्या कायद्यानुसार बंद पडलेल्या मिलच्या जागेचे समान तीन भाग करून एक भाग मिल कामगारांना द्यायचा निर्णय झाला आहे; मात्र आता गिरणी कामगारांची फसवणूक करून काही जण आपली तिजोरी भरण्याचे काम करत आहेत.कामगारांना मुंबईमध्येच घर मिळाले पाहिजे त्यासाठी जागोजाग गिरणी कामगारांच्या सभा घेऊन आम्ही लढा उभारत आहोत. वेळ पडली तर येथील गिरणी कामगारांनी महामार्गावर रस्ता रोको करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com