न्हावरेतील अजित सोसायटीच्या अध्यक्षपदी सोनवणे

न्हावरेतील अजित सोसायटीच्या अध्यक्षपदी सोनवणे

Published on

न्हावरे, ता. ५ ः न्हावरे (ता.शिरूर) येथील अजित सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी तुकाराम सोनवणे तर उपाध्यक्षपदी विजया साठे यांची बिनविरोध निवड झाली. इतर संचालकांना पदाची संधी मिळावी म्हणून अध्यक्ष गोरक्ष पवार व उपाध्यक्ष सुरेखा गारगोटे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. रिक्त जागेच्या निवडीसाठी निवडणूक अधिकारी पी. व्ही. हराळ व सचिव तुकाराम धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीत या दोघांचाच उमेदवारी अर्ज आल्यामुळे अध्यक्षपदी सोनवणे व उपाध्यक्षपदी साठे यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संचालक गोरक्ष पवार, सुरेखा गारगोटे, हनुमंत कोरेकर आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com