‘ओंकार शुगर ऊस उत्पादकांच्या हितासाठी कटिबद्ध’

‘ओंकार शुगर ऊस उत्पादकांच्या हितासाठी कटिबद्ध’

Published on

न्हावरे, ता.१९ : ‘‘ओंकार शुगर ग्रुप साखर कारखान्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी कामगार, ऊस वाहतूकदार, कारखाना कामगार व पुरवठादार यांच्यासाठी राजकारण विरहित प्रामाणिकपणे काम करीत आहे. यामुळे ग्रुपवर दिवसेंदिवस सगळ्या घटकांचा विश्वास वाढत आहे,’’ अशी माहिती ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली.

कारखान्यातर्फे शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, न्हावरे, आदी विविध ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप करण्यात आली. त्यानंतर बोत्रे पाटील यांनी माहिती देताना सांगितले की वरील दोन्ही कारखान्यांनी गतवर्षी गाळप केलेल्या उसाला अखेर प्रतिटन ३ हजार १०१ रुपये बाजारभाव देऊन अहिल्यानगर जिल्ह्यात इतर कारखान्याच्या तुलनेत सर्वाधिक बाजारभाव देण्याचे सकारात्मक काम केले आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी कारखान्यांना गळीतासाठी ऊस दिला त्यांना दिवाळीनिमित्त मोफत साखर देण्याचे काम करून अधिकचा गोडवा निर्माण केला आहे. दरम्यान, यापुढेही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ओंकार शुगर ग्रुपवर विश्वास ठेवून ऊस गाळपासाठी द्यावा कारण ओंकार शुगर ग्रुप हा संस्था, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांना केंद्रबिंदू काम करीत आहे. दरम्यान, साखर वाटपप्रसंगी शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे ओंकार शुगर ग्रुपचे संचालक प्रशांत बोत्रे पाटील यांच्या हस्ते साखर वाटपाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी रोहिदास यादव, दिनेशजी दरेकर, माऊली जगताप, भाऊसाहेब हिंगे, वसंत सोनवणे, अण्णा हांडे, संजय जांभळकर, विश्वास शितोळे, राजेंद्र बोत्रे, बाळासाहेब वाबळे, रवींद्र मोरे,अमित हिंगे, विजयराव चकोर, गणेश शेलार, संदीप खळदकर, प्रतीक गारगोटी आदी मान्यवर उपस्थित होते.
02402

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com