न्हावरे सोसायटीच्या अध्यक्षपदी खंडागळे

न्हावरे सोसायटीच्या 
अध्यक्षपदी खंडागळे
Published on

न्हावरे, ता. २८ ः न्हावरे (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेश खंडागळे, तर उपाध्यक्षपदी हिरामण करपे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेचे मावळते अध्यक्ष विजय कदम व उपाध्यक्ष गणेश खंडागळे यांनी राजीनामे दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदांसाठी संचालक मंडळाच्या बैठकीत खंडागळे आणि करपे यांचे अर्ज एकमेव आल्याने त्यांची बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पासाहेब धायगुडे यांनी, तर सहाय्यक अधिकारी म्हणून सतीश चव्हाण यांनी काम पाहिले. या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थ, संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

02548, 02549

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com