थापलिंग खंडोबा देवाची यात्रा शुक्रवारपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थापलिंग खंडोबा देवाची यात्रा शुक्रवारपासून
थापलिंग खंडोबा देवाची यात्रा शुक्रवारपासून

थापलिंग खंडोबा देवाची यात्रा शुक्रवारपासून

sakal_logo
By

निरगुडसर ता. २ : पुणे जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र थापलिंग खंडोबा देवाची यात्रा पौष पौर्णिमेनिमित्त शुक्रवार (ता.६ ) व शनिवार (ता. ७ ) रोजी पार पडणार आहे. यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली.
दर वर्षी पौष पौर्णिमेला श्रीक्षेत्र थापलिंग गडावर खंडोबा देवाची यात्रा भरते. यंदा यात्रा मोठी भरणार असून यात्रेची जय्यत तयारी देवस्थान ट्रस्टच्या वतीने केली आहे. थापलिंग यात्रेनिमित्त पुणे, नगर जिल्ह्यातील दोन दिवस लाखो भाविक थापलिंग गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी येतात.
तसेच यात्रेत नवसाचे बैलगाडे पळवले जातात. यासाठी कोणत्याही प्रकारचे इनाम, बक्षीसे ठेवली जात नाहीत, हे यात्रेचे वैशिष्टे आहे. यंदा यात्रेत थापलिंगच्या घाटात बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळणार आहे. यंदा बैलगाडे टोकन पद्धतीने सोडण्यात येणार आहेत. मंगळवारी (ता. ३) सकाळी ८ ते ११ या वेळेत बैलगाडा मालकांना थापलिंग गडावर टोकन वाटप करण्यात येणार आहेत. त्यासाठी टोकन फी ५०० रुपये आकारली जाणार असून ती बैलगाडा जुपत्या प्रसंगी पुन्हा माघारी दिली जाणार आहे. यात्रा चार दिवसांवर येऊन ठेपल्याने गडावर विविध प्रकारच्या स्टॉल व दुकाने उभारण्यास सुरुवात झाली आहे.