थोरांदळे येथे सुरा लावून ज्येष्ठ दांपत्यास लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थोरांदळे येथे सुरा लावून  
ज्येष्ठ दांपत्यास लुटले
थोरांदळे येथे सुरा लावून ज्येष्ठ दांपत्यास लुटले

थोरांदळे येथे सुरा लावून ज्येष्ठ दांपत्यास लुटले

sakal_logo
By

निरगुडसर, ता. ९ : थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील सीताराम मनाजी मिंडे व चिनकाबाई सीताराम मिंडे या ज्येष्ठ दांपत्याच्या गळ्याला सुरा लावून जीवे मारण्याची धमकी देत ९ तोळे सोने व रोख रक्कम ७ हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना बुधवारी (ता. ८) रात्री साडेनऊ वाजता घडली.
थोरांदळे येथील पाईनमळ्यात मिंडे ज्येष्ठ दांपत्य राहतात. त्यांचे घर चारीजवळ एकांतात आहे. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता जेवण आटवून ते घरात बसले होते. त्यावेळी घरातील वीज गेली आणि चोरट्यांनी डाव साधला. पहिल्यांदा घराबाहेरील सर्व बल्ब काढून घेऊन घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला. तीन जण अचानक घुसल्याने या दांपत्याचा आवाजही निघत नव्हता. चोरट्यांनी मिंडे दांपत्याच्या गळ्याला सुरा लावला आणि सोने नाणे रोख रक्कम जे आहे ते देण्याची धमकी दिली. चिनकाबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील कुड्या वेल, नाकातील फुल्या तसेच कपाटातील मंगळसूत्र चोरट्यांनी काढून घेतले. तसेच, घरातील सात हजार रुपये रोख, असा ऐवज चोरून चोरटे पसार झाले. चोरीची माहिती ग्रामस्थांना कळल्यानंतर सर्व जण मिंडे दांपत्याच्या घरी पोचले. मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच, गुरुवारी दुपारी बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, सोपान घुले, दत्ता विश्वासराव आदी ग्रामस्थांनी भेट दिली.