रांजणी परिसरातील चार दुकानांतून चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांजणी परिसरातील 
चार दुकानांतून चोरी
रांजणी परिसरातील चार दुकानांतून चोरी

रांजणी परिसरातील चार दुकानांतून चोरी

sakal_logo
By

निरगुडसर, ता. ३ : कारफाटा-रांजणी (ता. आंबेगाव) येथे बुधवारी (ता. १) पहाटे चोरट्यांनी चार दुकाने फोडली. एका दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न फसला. दुकानात रोख रक्कम काही नसल्याने चोरट्यांनी चिल्लरवर डल्ला मारला.
रांजणी गावठाण ते कारफाटा येथील श्रीराम चौकादरम्यान असलेल्या माऊली कृषी सेवा केंद्र या दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, परंतु त्यांचा प्रयत्न फसला. त्यानंतर चोरट्यांनी कारफाटा येथील जय मल्हार ॲग्रो सर्व्हिसेस, शेतकरी कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी कृषी उद्योग या दुकानांचे मागील बाजूचे पत्रे उचकटले. तसेच, राजलक्ष्मी मेडिकलचे शटर चोरट्यांनी उचकटण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना आत जाता आले नाही. दुकानांमधील चिल्लर चोरट्यांनी लंपास केली. याच दिवशी वळती गावातील अमोल तुकाराम भोर यांच्या घरासमोर लावलेली दुचाकीदेखील चोरट्यांनी चोरून नेली.