निरगुडसर आरोग्य केंद्रात हेळसांड

निरगुडसर आरोग्य केंद्रात हेळसांड

निरगुडसर, ता. २० : निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (ता. १९) ४८ महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडल्या. मात्र, शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर महिलांना सतरंजीवर झोपविण्यात आले, तसेच सकाळी आठ वाजेपर्यंत महिलांना चहा-नाश्ता दिला नाही या ठिकाणी महिलांची हेळसांड झाली असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईक नीलिमा खळे यांनी केला.

निरगुडसर ग्रामस्थांनी रविवारी (ता. २०) प्राथमिक आरोग्य केंद्रात समक्ष जाऊन रुग्णांशी चर्चा केली असता रुग्णांनी कोणतीही तक्रार केली नाही. काही रुग्णांच्या नातेवाइकांनी रात्रीच्या वेळी महिला कक्षामध्ये प्रवेश करून व्हिडिओ शूटिंग केली. यावेळी महिला बेशुद्ध अवस्थेत होत्या. हा प्रकार अतिशय निंदणीय आहे.
- रामदास वळसे पाटील, माजी उपसरपंच

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर सहा ते आठ तास महिला बेशुद्ध असतात. त्यावेळी महिला बेडवर झोपल्यास खाली पडू शकतात, म्हणून आम्ही महिलांना बेडवर न झोपावता खाली गादीवर झोपवतो. परंतु गाद्या अपुऱ्या पडल्यामुळे सदर महिलांना सतरंजीवर झोपवल्याचे सांगितले आणि सकाळी रुग्णालयाच्या गाडीमधून महिलांना घरी सोडवण्यात येते असल्यामुळे चहा-नाश्ता देता येत नाही.
- डॉ. शारदा मोरमारे, वैद्यकीय अधिकार, निरगुडसर

माझी जाऊबाई सारिका मिलिंद खळे हिला शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयाच्या पॅसेजमध्ये सतरंजीवर झोपवण्यात आले. सकाळी दहा वाजेपर्यंत चहा नाश्ता दिला नाही. तिच्याबरोबर काही महिलांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. याबाबत आम्हाला माहिती दिली गेली नाही. त्यामुळे दोषी यंत्रणेवर कारवाई करावी.
- नीलिमा खळे, तक्रारदार

पत्रकारांवरच गुन्हा दाखल
झालेल्या प्रकाराबद्दल निरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा मोरमारे यांनी पारगाव पोलिस ठाण्यात पत्रकार विलास भोर व संदीप खळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. ‘तुम्ही ऑपरेशन झालेल्या महिलांना खाली का झोपविले? उपाशीपोटी का ठेवले?’ असे म्हणून वाद घातला व महिलांचे व्हिडिओ शूटिंग काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार शासकीय कामात अडथळा केल्याबद्दल पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com