बाल आनंद मेळाव्यात ३० हजारांची उलाढाल

बाल आनंद मेळाव्यात ३० हजारांची उलाढाल

निरगुडसर, ता. ६ : विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाची माहिती व्हावी तसेच गणित विषयाच्या मूलभूत क्रियांना चालना मिळावी, या उद्देशाने वळसेमळा (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘बाल आनंद मेळावा’ उपक्रमाचे आयोजन केले होते. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी लावलेल्या ३० स्टॉल मधून सुमारे ३० हजार रुपयांची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून हायटेक (उच्च) तंत्रज्ञानाचा वापर करत ग्राहकांना खरेदी-व्यवहारासाठी भीम ॲप, पे-टिएम सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती मुख्याध्यापक जवाहर हिंगे यांनी दिली.
ग्रामस्थांच्या हस्ते या आनंद मेळाव्याचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब वळसे पाटील, धनेश वळसे पाटील, नीलिमा हिंगे, संभाजी वळसेपाटील विक्रम वळसे, डॉ. सुरेश टाव्हरे, सायली वळसे, गणपत वळसे, संजय वळसे, संतोष वळसे, गणेश वळसे, प्रसाद वळसे, ऋषिकेश वळसे, अमित वळसे, प्रतीक वळसे, साहेबराव कुरकुटे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com