पांढरी वस्ती-खडकी विविध धार्मिक कार्यक्रम

पांढरी वस्ती-खडकी विविध धार्मिक कार्यक्रम

निरगुडसर, ता. २५ : महादेव पांढरी वस्ती-खडकी (ता. आंबेगाव) येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली.
श्री हनुमान जयंतीनिमित्ताने मंगळवारी (ता. २३) पहाटे मंदिरात काळभैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळ खडकी यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर हनुमान जन्मोत्सव आरती, शेरणी वाटप झाल्यानंतर मांडव डहाळे ग्रामस्थांच्या वतीने हनुमानाच्या मूर्तीला सामुहिक अभिषेक घालण्यात आला. यावेळी मंगल महाराज जगताप यांचे कीर्तन झाले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ पोखरकर, सरपंच नारायण बांगर, उपसरपंच सोनल अरगडे, सामाजिक कार्यकर्ते दीपक बांगर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची सर्व व्यवस्था जय हनुमान मित्र मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com