बिबट्याला पकडायला पिंजरे देता का पिंजरे?

बिबट्याला पकडायला पिंजरे देता का पिंजरे?

Published on

निरगुडसर, ता.२० : मंचर वनपरिक्षेत्रातील ५० गावात २५० ते ३०० बिबट्यांचा वावर आहे. यामुळे ते बिबट्याचे हॉटस्पॉट बनले आहे. दररोज होणारे बिबट्याचे हल्ले, त्याचे दर्शन यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यांसाठी अवघे २० पिंजरे असल्याने पिंजरे देता का पिंजरे? असे म्हणण्याची वेळ खुद्द वनविभागावरच येऊन ठेपली आहे.
आंबेगाव तालुक्यातील ५० गावे मंचर वनपरिक्षेत्रात येतात. या परिसरात ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात बिबट्यांचा वावर अधिक आहे. मंचर वनपरिक्षेत्र बिबट्यासाठी हॉटस्पॉट ठरत आहे. ५० गावांसाठी अवघे २० पिंजरे असल्याने पिंजरे लावण्यासाठी अडचणी येत आहेत.


आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात घोडनदीजवळ असल्याने पिण्यासाठी पाणी, आश्रयासाठी ऊस आणि शिकार हे सहज उपलब्ध होत आहे. यामुळे येथे बिबट्यांची संख्या मोठी आहे. परंतु वनविभागाकडे अवघे २० पिंजरे असल्याने प्रत्येक ठिकाणी पिंजरे लावणे अशक्य होते. अशा परिस्थितीत साखर कारखान्यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक गावासाठी एक पिंजरा उपलब्ध करून दिला पाहिजे. यातून बिबटे पकडले जातील,आणि ऊसउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.


१०० पिंजरे उपलब्ध करण्याची गरज
वनविभाग म्हणेल तेथे पिंजरा लावण्यास तयार आहे. परंतु पिंजरे नाहीत तर लावणार कुठे? त्यामुळे सरकारने १०० पिंजरे उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यातून बिबट समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. बिबट्याला पळवून लावण्यासाठी एआय मशिन, कोणत्याही प्राण्याची हालचाल टिपण्यासाठी अनायडर मशिन, सोलर झटका मशिन, स्पेशल लेपर्ड प्रोटेक्शन फोर्स या सेवा सुविधांची तातडीने गरज आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर वन परिक्षेत्रातील बिबट प्रवण क्षेत्रात ११ एआय मशिन, चार अनायडर मशिन,२० लोकांना सोलर झटका मशिन बसवण्यात आले असल्याची माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.

यासाठी आकस्मित निधीची गरज:
पिंजरा लावणे, भक्ष ठेवणे
बिबट्याचा हल्ल्यावरील उपचार
पेट्रोलिंग करण्यासाठी


सरकारकडून नव्याने २०० पिंजऱ्यांसाठी निधी मंजूर झाला आहे परंतु अद्याप प्रशासकीय मान्यतेचे पत्र जुन्नर कार्यालयाला प्राप्त झाले नाही परंतु लवकरच पिंजऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल.
- प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक, जुन्नर

मंचर वनपरिक्षेत्रात असलेल्या ५० गावात जवळपास २५० ते ३०० बिबट्यांचा वावर आहे. बिबट्यांची संख्या मोठी असून यासाठी अवघे २० पिंजरे आहेत त्यामुळे कितीही पिंजरे लावण्याची मागणी केली तरी पिंजरेच नसल्याने पिंजरे लावू शकत नाही तरी या ५० गावात १०० पिंजऱ्यांची गरज आहे.
- विकास भोसले, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com