कुरकुटे मळ्यात भर दिवसा
बिबट्याने शेळी केली ठार

कुरकुटे मळ्यात भर दिवसा बिबट्याने शेळी केली ठार

Published on

निरगुडसर, ता. ३० : शेळ्या चरत असताना भर दिवसा बिबट्याने हल्ला करत शेळीला ठार केले. भराडी (ता.आंबेगाव) येथील कुरकुटे मळ्यातील मारुती सोपान कुरकुटे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याने १० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी (ता. २८) रोजी घडली.
भराडी येथील कुरकुटे मळ्यातील शेतकरी मारुती कुरकुटे यांच्या शेळ्या दुपारच्या सुमारास चरत होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळीवर हल्ला करून ठार केले. यावेळी परिसरातील शेतकरी यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. पोलिस पाटील संतोष खिलारी यांनी घटनेची माहिती वनविभागाला कळवली. त्यानंतर घडलेल्या घटनेचा वनविभागाने पंचनामा केला आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण आहे, तरी वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com