खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे
निरगुडसर, ता. १७ : गेल्या वर्षभरात खतांच्या किमती ५० रुपयांपासून ते ४५० रुपयांपर्यंत प्रति ५० किलो पिशवीमागे दरवाढ झाली आहे. पुढील काही दिवसांत अजून खतांच्या किंमतीत वाढ होणार असून एका पिशवीमागे ५० ते २०० रुपयांपर्यंत ही वाढ होण्याची शक्यता आहे. भरमसाठ दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.
तरकारी पिकांपासून तर नगदी पिके, ऊस आदी पिकांना खतांचा डोस देणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. व्हाइट पोटॅशची किंमत गेल्या दोन वर्षांत जवळपास दुपटीने वाढली आहे. दोन वर्षांपूर्वी ११०० रुपयांना मिळणारी ५० किलोची पिशवी १८५० वर गेली आहे. अशाप्रकारे वर्षभरात खतांच्या किमतीत ५० रुपयांपासून ते ४५० रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे अजूनही पुढील काही दिवसात खतांच्या किमती वाढणार असल्याची काही कृषी सेवा केंद्र चालकांनी सांगितले आहे. ही दरवाढ अंदाजे ५० किलो पिशवीमागे ५० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत होणार असल्याचे बोलले जात आहे अशा प्रकारे खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे.
वर्षापूर्वीचा ५० किलो खत पिशवीचा दर कंसात (सध्याचा दर)
१०:२६:२६ ..........१४५०(१९००)
२४:२४:००..........१८५०(१९००)
१५:१५:१५..........१४५०(१६५०)
८:२१:२१..........१८००(१९७५)
९:२४:२४..........१९००(२१००)
गेल्या वर्षभरात खत दरवाढीमुळे भांडवली खर्चात मोठी वाढ झाली आहे. अजून खत दरवाढीचे संकेत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ होणार आहे. गेल्या वर्षभरात खतांच्या किमतीत वाढ झाली असून ऊस लागवडीपासून एकरी १० हून अधिक खताच्या पिशव्या टाकाव्या लागतात. त्यामुळे एकरी पाच हजार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. अजून दरवाढ झाल्यास एकरी खतांचा खर्च १० हजारांच्या वर जाईल. यामुळे आर्थिक गणित बिघडले आहे.
- रामानंद वळसे पाटील, प्रगतशील शेतकरी, निरगुडसर (ता.आंबेगाव)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

