
डॉ. उषा भोईटे यांच्या शोधनिबंधाची आंतरराष्ट्रीय परिषदेत निवड
नीरा नरसिंहपूर, ता. ७ ः डॉ. विश्वनाथ कराड यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त व भारत ‘जी-२०’चे अध्यक्षपद भूषवत आहे याचे औचित्य साधून एमआयटी ज्ञानेश्वर बी. एड. कॉलेज, आळंदी पुणे येथे एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा विषय ‘वसुधैव कुटुंबकम’ हा होता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका डॉ. उषा भोईटे- पवार यांनी ‘वसुधैव कुटुंबकम काळाची गरज’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. त्यामध्ये डॉ. भोईटे यांच्या शोधनिबंधाची निवड करण्यात आली.
एकूण १०० पैकी निवडक ८२ शोधनिबंध प्रकाशित करण्यात आले.
हा शोधनिबंध ‘आयएसएसएन’ नामांकनप्राप्त पुस्तकात प्रकाशित झाला आहे. या आंतरराष्ट्रीय पुस्तकात लेख प्रकाशित होणाऱ्या त्या एकमेव प्राथमिक शिक्षिका आहेत. ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेत भारत देशाची भूमिका काय आहे. आज या मूळ भारतीय संस्कृतीची काय गरज आहे, यावर डॉ. भोईटे यांनी लेखन केले आहे. एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पुणेच्या विश्वस्त स्वाती कराड- चाटे, प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेळकर, डॉ. संजय शिंदे यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. भोईटे यांचे दोन आंतरराष्ट्रीय शोधनिबंध, तसेच नऊ राष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
-----------------