Sat, March 25, 2023

इंदापुरातील अवैध धंद्यावर
कारवाई करण्याची मागणी
इंदापुरातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मागणी
Published on : 9 March 2023, 8:46 am
नीरा नरसिंहपूर, ता. ९ : इंदापूर तालुक्यात मटका, जुगारासह अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्यातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ‘मोका’अंतर्गत कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अश्वजित कांबळे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक आदींना दिल्या आहेत.