नीरा नरसिंहपूर येथे अहिल्यादेवींची जयंती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीरा नरसिंहपूर येथे अहिल्यादेवींची जयंती उत्साहात
नीरा नरसिंहपूर येथे अहिल्यादेवींची जयंती उत्साहात

नीरा नरसिंहपूर येथे अहिल्यादेवींची जयंती उत्साहात

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. २ ः राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आशासेविका, अंगणवाडी सेविका आदींचा ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले.
बावडा ग्रामपंचायत येथे झालेल्या कार्यक्रमात सरपंच किरण पाटील यांनी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी उपसरपंच नीलेश घोगरे, दादासाहेब कांबळे, अंकुश शेंडगे, चंद्रकांत घोगरे, सारिका कांबळे, सिंधू गायकवाड, ग्रामसेविका अंबिका पावसे आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ग्रामीण भागात सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल ''पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार'' आशासेविका रफीया शौकत तांबोळी व अंगणवाडी सेविका बेबी ढवळसकर यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी, शाल, हार देवून सरपंच किरण पाटील, उपसरपंच नीलेश घोगरे व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जालिंदर गायकवाड, चिंतामणी गायकवाड, रमेश जाधव, सतीश साबळे, उत्तम मोहिते, बापू सोनवणे, विशाल कांबळे, सतीश कांबळे, आबा पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी बुद्रुक येथील आशासेविका स्वाती पाटील, मदतनीस नागर पाटील, ओझरे येथील आशासेविका रूपाली चव्हाण, गोंदी येथील आशासेविका सुरेखा क्षिरसागर, गिरवी येथील आशासेविका पुष्पा ठोकळे, अंगणवाडी सेविका ठोकळे, टणू येथील आशासेविका मालन जगताप, बळते, लुमेवाडी येथील आशासेविका रेशमा सय्यद, बशीरा शेख, नरसिंहपूर येथील अंगणवाडी सेविका संगीता देवळे, बचत गटाच्या प्रमुख अनघा कोळी आदींना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देवून गौरविण्यात आले.