जिवापाड जपलेली पिके मोजतायेत शेवटची घटका

जिवापाड जपलेली पिके मोजतायेत शेवटची घटका

नीरा नरसिंहपूर, ता. १० : जिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकत असून, पारा ४३ अंश सेल्सिअस पार गेला आहे. याचा फटका पिके, जनावरे तसेच माणसांनाही बसत आहे. उन्हाच्या तीव्रतेने अंगाची लाही लाही होत आहे. इंदापूर तालुक्यात नीरा व भीमा नद्यांसह विहिरी, कूपनलिका आटल्या आहेत. पाणी न मिळल्याने पिके, फळझाडे शेवटची घटका मोजत आहेत. ती जगविण्यासाठी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे पिके, फळझाडे, चारापिकांची मोठी होरपळ होत आहे. प्राणी, पशुपक्षी, जनावरांना चारापाण्यासाठी झगडावे लागते आहे तर पाण्याअभावी शेतात उभ्या असणाऱ्या पिकांवरही परिणाम पहावयास मिळत आहे. शेतातील पीक जिवापाड सांभाळण्याकरीता शेतकरी धडपड आहेत. चारा पिकांना कितीही पाणी दिले तरीसुद्धा उन्हाच्या प्रभावाने पिके सुकू लागली आहेत.
उष्णतेमुळे जनावरांना उष्माघाताचा परिणामाने आजारी पडून दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक पशुपालकांनी आपल्या जनावरांसाठी हवेशीर गोठे बांधले असून, पंख्यांचा वापर केला आहे. तर सकाळी व दुपारी जनावरांच्या अंगावर पाणी फवारणी, गार पाण्याचा मारा करणे, पौष्टिक आहार देणे, सकाळी व संध्याकाळी अशा वेळेतच चरायला सोडने असा दिनक्रम ठेवला आहे.

कडक उन्हामुळे विहिरी, नद्यांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. सध्या पिकांना सतत पाणी देण्याची वेळ येत आहे. जर उन्हाचा पारा असाच राहिला तर पिके वाचविणे मुश्कील होणार आहे, असे परिसरातील शेतकरी शशिकांत सूर्यवंशी, बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब जाधव, सुभाष बोडके, बच्चन मिस्त्री आदींनी सांगितले.


दुष्काळाच्या लाभाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
शासनाने बारामती, इंदापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असला तरीसुद्धा दुष्काळाचे कोणतेही लाभ मिळाले नाहीत. बागायती पट्ट्यातील येणाऱ्या गावांना नीरा व भीमा नद्या आटल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. भीमा नदीला उजनीतून पाणी सोडल्याने काही प्रमाणात दिलासा मिळणार असून, नीरा नदीची परिस्थिती गंभीर बनली आहे, यामुळे शेतकरी चिंतातूर बनला आहे.

04038

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com