सराटीतील पालखी मार्गाला कुबाभळींचा विळखा
नीरा नरसिंहपूर, ता. २९ ः सराटी (ता. इंदापूर) येथे सोमवारी (ता. ३०) जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्कामाला येणार आहे. मात्र, इंदापूर- अकलूज पालखी मार्गाचे काम चार वर्षांपासून रखडल्याने वारकऱ्यांचा मार्ग खडतर होणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने सराटीपर्यंतचे काटेरी बाभळी, गवत, राडारोडा काढलेला नाही.
तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूरचा मुक्काम आटोपून सोमवारी पुणे जिल्ह्यातील शेवटचा सराटी येथे मुक्कामी येणार आहे. परंतु इंदापूर - अकलूज ३० किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे काम चार वर्षांनंतरही रखडलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांनी मार्गाच्या दुतर्फा उगवलेल्या काटेरी कुबाभळी, गवत, तसेच राडारोडा काढलेला नाही. यामुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी एकदाही सराटी मुक्कामी भेट देण्याचे धाडस केलेले नाही. सराटी मुक्काम आटोपून पालखी अकलूजकडे मार्गस्थ होतानाच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी कुबाभळ रस्त्यावर झुकलेली आहेत. त्यामुळे वारकरी, रथाचे बैल व यंत्रणेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या तोंडाला, हाताला ओरबडण्याची शक्यता आहे. तसेच पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पालखी, वारकरी यांना त्रास होण्याची जास्त शक्यता आहे.
कामात निष्काळजीपणा, हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्याविरुद्ध क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे कठोर कारवाई करणार का? तसेच रस्त्याचे अडकलेले काम तातडीने पूर्ण करण्यात येणार का? असा सवाल वारकरी, स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.