इंदापुरात बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रॉल्या दुरुस्तीस वेग
नीरा नरसिंहपूर, ता. १४ : राज्यातील साखर कारखान्यांचा २०२५-२६ चा गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे ऊस वाहतूक करण्यासाठी वाहनांची आवश्यकता असते. यासाठी बैलगाडी, ट्रक व ट्रॅक्टर, ट्रॉल्या दुरुस्तीच्या कामांना वेग आला असून, त्यामुळे इंदापूर तालुक्यात अनेकांना रोजगार मिळत आहे.
साखर कारखान्यांचा सन २०२५-२६ चा गळीत हंगामाला एक नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, ट्रॉल्यांना रंगकाम करने, बेअरिंग बदलने, ग्रेसिंग करने, टायर बदलने, डाबरच्या हुकची दुरुस्ती करने, वेल्डिंग मारने आदी कामे करण्याला प्राधान्य दिले जात आहे. अनेक ठिकाणी गावोगावी असणाऱ्या गॅरेजमध्ये दुरुस्ती करून घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. रात्रंदिवस गॅरेज सुरू ठेवून कामगार काम पूर्ण करण्याच्या प्रयत्न करत आहेत. संपूर्ण हंगामात पुन्हा वाहनांना कोणतेही अडचण येऊ नये यासाठी हंगामाच्या सुरुवातीलाच सर्व काम करून घेतले जात आहे.
आम्हाला साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सुरू होण्याच्या दोन ते तीन महिने अगोदर पासूनच कामाला सुरुवात करावी लागत असून हंगाम सुरू झाला तरी कामे पूर्ण होत नाही, असे गॅरेज चालक, मालक गणेश जाधव यांनी सांगितले.
ट्रक, ट्रेलर, बैलगाड्या (बजाट) यांना रंगकाम करने, बेअरिंग बदलने, ग्रेसिंग करने, टायर बदलने, डाबरच्या हुकची दुरुस्ती करने, वेल्डिंग मारने व शेवटी कलर काम करूनच वाहन ताब्यात द्यावे लागते असे मुन्नाभाई शेख, गॅरेज मालक यांनी सांगितले.
आम्ही प्रत्येक वर्षी गळीत हंगामासाठी ट्रॅक्टर, ट्रेलरचा वापर करत असून हंगाम संपल्यानंतर इतर कोणतेही काम न करता वाहने बसवून ठेवत असतो. परंतु हंगामाच्या तोंडावर सर्व दुरुस्ती करूनच वाहन रस्त्यावर आणत आहे.
- नबीलाल शेख, वाहन मालक
05131
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.