पुणे
दत्त देवस्थानची पालखी गणेशवाडीत मुक्कामी
नीरा नरसिंहपूर, ता. ३० : कार्तिकी एकादशीच्या वारीसाठी दत्त देवस्थान राशीन येथून पंढरपूरकडे निघालेल्या पालखीचा परंपरेनुसार गणेशवाडी येथे मुक्काम होता. त्यानिमित्त प्रकाश महाराज जंजिरे यांचे कीर्तन झाले.
गणेशवाडी येथील मारुती मंदिरात परंपरेनुसार राशीन (ता. दौंड) येथील दत्त देवस्थानची पालखी सोहळा मुक्कामी असतो. पालखी सोहळ्याचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. पालखी समवेत आलेल्या वारकऱ्यांना नागरिक सायंकाळी जेवण, चहा, नाष्टा देतात. त्यानंतर सायंकाळी प्रकाश महाराज जंजिरे यांची कीर्तन सेवा घेण्यात आली. सकाळी पालखीची आरती ग्रामस्थांतर्फे घेण्यात आली. त्यानंतर पालखी पिंपरी बुद्रुक, टणू, नरसिंहपूर मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.

