निसर्गरम्य वातावरणात ओतूरच्या विद्यार्थ्यांचा मेळावा

निसर्गरम्य वातावरणात ओतूरच्या विद्यार्थ्यांचा मेळावा

Published on

ओतूर, ता. २ : येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील वयाची पन्नाशी पार केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा जुन्नरजवळील लेण्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य परिसरातील पर्यटन केंद्रात मोठ्या उत्साहात पार पडल्याची माहिती संजय येंधे व किसन नलावडे यांनी दिली.
श्री गणेश पूजन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मेळाव्यानिमित्त तब्बल ३७ वर्षांपूर्वीचे ४० सवंगडी एकत्र जमले होते. प्रास्ताविकात अनिल बोडके यांनी सर्वांचे स्वागत करून दिवंगत मित्र मैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सर्वांनी आपापला परिचय दिला. त्यानंतर झालेल्या गप्पा गोष्टींमधून शालेय व महाविद्यालयीन काळातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शालेय जीवनातील अनुभव मांडताना क्षणोक्षणी हास्याचे फवारे उडत होते.
दुपारच्या सत्रात विविध गुणदर्शनात रुकसाना जमादार व पांडुरंग गवांदे यांनी सुरेल आवाजात अभंग सादर केले, तर नीता वाघ, संजय रसाळे, बापू रसाळे यांनी जुन्या नव्या बहारदार सिनेमा गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले. महिला वर्गाने विविध खेळ खेळून व फुगडीसह फोटोग्राफीचा मनसोक्त आनंद घेतला. सैराट या गाण्यावर तर सर्वजण थिरकले.
याप्रसंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील नलावडे, उद्योजक जालिंदर पानसरे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अशोक वाघ, सतीश ढमाले, शेखर जगदाळे, विजय वायकर, शांताराम नलावडे, बापू हैलकर, मच्छिंद्र वायकर, अशोक औटी, वंदना पानसरे, सुलभा डुंबरे, कमल मोरे, लतिका घोलप आदींनी परिश्रम घेतले. बापू रसाळे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल बोडके यांनी आभार मानले. वंदे मातरम या ध्वज गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com