ओतूर येथे संगीत भजन स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
ओतूर, ता. ५ : ओतूर (ता. जुन्नर) येथे ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर यात्रेनिमित्त दुसऱ्या श्रावण सोमवारी सालाबादप्रमाणे कै. रामचंद्र भाऊसाहेब डुंबरे ऊर्फ बबन सर यांच्या स्मरणार्थ भव्य संगीत भजन स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नामवंत संगीत भजन मंडळ सहभागी झाली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास सोळा हजार रुपये, द्वितीय क्रमांकास तेरा हजार रुपये, तृतीय क्रमांकास अकरा हजार रुपये बक्षीस ठेवले होते, अशी माहिती कपर्दिकेश्वर देव धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे व सचिव महेंद्र पानसरे यांनी दिली.
मानाचे भजन विठ्ठल प्रा. भ. मंडळ धोलवड यांचे झाले.
या भजन स्पर्धेसाठी रघुनाथ तांबे, शांताराम पानसरे, राजेंद्र डुंबरे, रोहिदास घुले, भास्कर डुंबरे, अविनाश ताजणे, बाळासाहेब डुंबरे, ज्ञानेश्वर पानसरे, सुनील डुंबरे, प्रकाश डुंबरे, पांडुरंग ढोबळे, अरुण घुले, सीताराम डुंबरे, धनंजय डुंबरे, पाटीलबुवा ढमाले, संदेश साळुंखे, बबन तांबे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या भजन स्पर्धेचे संयोजन कपर्दिकेश्वर देव धर्म संस्थेचे माजी सचिव जी. आर. डुंबरे पाटील व खजिनदार संजय डुंबरे यांनी केले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून संतोष झावरे व मंगेश कोंडार यांनी काम पाहिले. संतोष कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
विजेते संघ पुढीलप्रमाणे :
पहिला क्रमांक : विभागून जय मल्हार भजन मंडळ धामणखेल, सायली-स्वरांजली भजन मंडळ पिंपरी पेंढार, काटेश्वर भजन मंडळ भिवाडे बु., पुष्पावती विद्यालय भजन मंडळ डिंगोरे.
दुसरा क्रमांक : विभागून जय मल्हार भक्ती संगीत भजन मंडळ धामणखेल, केळेश्वर भजन मंडळ केळी कोतूळ, वरसूबाई प्रा. भजन मंडळ वरसावणे, महालक्ष्मी भजन मंडळ रोहोकडी.
तृतीय क्रमांक : विभागून दुर्गामाता भजन मंडळ जुन्नर, सालोबा भजन मंडळ इंगळूण डामसेवाडी, पुष्पेश्वर भजन मंडळ पिंपळगाव जोगा, वरसूबाई भजन मंडळ हिवरेपठार.