उदापुरातील पुष्पावती नदीवरील पूल खचला

उदापुरातील पुष्पावती नदीवरील पूल खचला

Published on

ओतूर, ता.२९ : पूल पिंपळगाव जोगा धरणामधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. यामुळे उदापूर (ता.जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील पुष्पावती नदीवरील खचून अर्धा वाहून गेला. काळभैरवनाथनगरकडे जाणाऱ्या तसेच नेतवड, माळवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

मंदिर परिसरात नवरात्रौत्सवानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला जाणारे भाविक भाविकांना अडचण निर्माण झाली असून, परिसरातील जनजीवन विस्कळित झाले आहे.
उदापूर येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील पुष्पावती नदीवर एक वर्षापासून नवीन पुलाचे काम सुरू आहे. मात्र, पिंपळगाव जोगा धरण प्रशासन पुष्पावती नदी नेहमी पूर्व सूचना न देता पाणी सोडते. त्यामुळे उदापूर येथे पुलाचे सुरू असलेल्या कामाचे साहित्य बुडून व वाहून जाऊन पुलाचे काम रखडत चालले आहे. पिंपळगाव जोगा धरण प्रशासन व पुलाचे काम करणारी ठेकेदार कंपनी यांच्यात प्रशासकीय पातळीवर समन्वय साधला जाऊन सदर नवीन पुलाचे काम लवकर व्हावे, अशी मागणी सरपंच सचिन आंबडेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाजीराव कुलवडे,माजी सैनिक दिलीप आरोटे यांनी केली आहे.
00832

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com