धोलवड येथील सोपान नलावडे ठरले आयर्नमॅन

धोलवड येथील सोपान नलावडे ठरले आयर्नमॅन

Published on

ओतूर, ता. ९ ः धोलवड (ता. जुन्नर) येथील सोपान मारूती नलावडे यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी दक्षिण कोरिया येथे झालेली आयर्न मॅन ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण केली असून आयर्नमॅन किताब पटकावला आहे. त्यांच्या या यशाचे धोलवडच नाही तर संपूर्ण तालुक्यामधून कौतुक केले जात आहे.
या स्पर्धेमध्ये सलग ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी मॅरेथॉन धावणे असे तीन टप्पे असतात. वयाच्या ६२ व्या वर्षी सोपान नलावडे यांनी हे सर्व टप्पे पंधरा तास सोळा मिनिटांत पूर्ण करत स्पर्धा पूर्ण केली.
दहा वर्षांपूर्वी त्यांचे वजन वाढले होते. त्यावेळी त्यांना डॉक्टरांनी सायकलिंग करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पुणे ते दिल्ली आणि पुणे ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास त्यांनी केला होता. सायकलिंग सोबत त्यांनी इतर व्यायामही ते करीत होते.
नलावडे यांनी दोन वर्षांपूर्वी व्यवसायामधूनही निवृत्ती घेतली होती. मागील एका वर्षापासून त्यांनी आयर्नमॅन स्पर्धेची तयारी केली. जिद्द, चिकाटी, कुटुंबाचा पाठिंबा व मित्रांकडून मिळालेले प्रोत्साहन यांमुळे त्यांनी हा किताब मिळवला असल्याचे ते सांगतात.

़़ ‘‘वय हा एक फक्त आकडा आहे. दृढनिश्चय, जिद्द, चिकाटी व मेहनतीने आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. पुढील काळात मी जागतिक दर्जाची मानाची मानली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील ९० किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणार आहे. त्यासाठीची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे.’’
- सोपान नलावडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com