पुणे
हरवलेली सोन्याची अंगठी मूळ मालकाला परत
ओतूर, ता. १७ : संगीता जाधव यांच्या मुलाच्या साखरपुडा समारंभाला अण्णासाहेब वाघिरे कॉलेजचे सुमारे २५ माजी विद्यार्थी एकत्रित संगमनेर येथे हजर होते. यावेळी कार्यालयात सर्वजण एकत्रच बसले होते. तेव्हा खुर्ची खाली पडलेली सोन्याची अंगठी चारुलता उत्तम भेके (वय ५०, रा. कळंब, ता.आंबेगाव) यांना मिळून आली होती. ही बाब त्यांनी मित्र बापू रसाळे व दोन तीन मैत्रिणींना अंगठी सापडल्याचे सांगितली. कार्यक्रमावरून घरी आल्यानंतर रुकसाना जमादार (रा. उंब्रज नं १, ता.जुन्नर) यांना आपली अंगठी हरवली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी फोनवर याबाबत इतरांसह चर्चा केली तेव्हा त्यांना तुमची अंगठी आहे. मग ती अंगठी रुकसाना जमादार या मैत्रिणींची असल्याची खात्री करून ती त्यांचे पती हमीद जमादार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

