ओतूरच्या विद्यालयात स्वच्छता, आरोग्यावर मार्गदर्शन
ओतूर, ता. ६ : ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री गाडगे महाराज विद्यालयात स्वच्छता व आरोग्याचा जागर हा उपक्रम शाळेतील किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आला. यावेळी मासिक पाळी याविषयी ३५ पस्तीस शाळांत डिसेंट फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून व ॲशलँड, इंटरनॅशनल स्पेशालिटी प्रॉडक्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (सीएसआर उपक्रम) यांच्या सहकार्याने मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत पस्तीस शाळेमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन व डिस्पोजल मशिन बसविण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात स्वच्छता, आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा लाभ होणार आहे.
या कार्यक्रमात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, मासिक पाळीतील घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता व स्वसंरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन व स्वतःच्या आरोग्याबाबत जबाबदारीची भावना निर्माण झाली.
याशिवाय पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन तसेच ‘कळी उमलताना’ या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप केले. ओतूर, बल्लाळवाडी, मढ, पिंपळगाव जोगा, पिंपरी पेंढार, वडगाव आनंद यांसह पस्तीस शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी जुन्नर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अशोक लांडे साहेब, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉ.एफ.बी.आतार, प्रा. एकनाथ डोंगरे, संचालक आदिनाथ चव्हाण, शिरीष डुंबरे, डॉ. पुष्पलता शिंदे, परिचारिका उज्ज्वला गवळी, छाया पाटील, शोभा तांबे, ज्येष्ठ नागरिक संघांचे रा. ज्ञा. डुंबरे, महादेव ओतूरकर, भिवाजी माळवे, शंकर भिसे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

