डॉ. डुंबरेंकडून अशीच उत्तम ग्रंथनिर्मिती व्हावी
ओतूर, ता. ८ ः ‘‘मराठी भाषा संतांनी समृद्ध केली. संत साहित्याने मराठी मनाची मशागत केली. संत साहित्य समीक्षेतील डॉ. दत्तात्रय डुंबरे यांचा ‘सार्वकालिक ज्ञानदेव तुकाराम’ हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. डुंबरे यांच्या हातून उत्तरोत्तर अशीच उत्तम ग्रंथनिर्मिती व्हावी,’’ असे गौरवोद्गार ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी काढले.
पुणे नगर वाचन मंदिराच्या १७८ व्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट संत साहित्य निर्मितीबद्दलचा पुरस्कार विवेकानंद महाविद्यालयातील भाषा संशोधन केंद्र व मराठी विभागाचे प्रमुख डॉ. दत्तात्रय डुंबरे यांना प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर पुणे नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष मधुमिलींद मेहंदळे, कार्याध्यक्षा स्वाती ताडफळकर, मालवण येथील गिरीधर साठे, रुपालीताई पाठक यांची उपस्थिती होती.
या सत्काराला उत्तर देताना डॉ. डुंबरे म्हणाले की, ‘‘ज्ञानोबा-तुकोबांचे विचार हे सार्वकालिक आहेतच पण नित्यनूतनही आहेत. म्हणून हे अभंग वाड्मय आहे. आजच्या अस्वस्थ वर्तमानात संतांचे विचार सुयोग्य दिशा दाखवू शकतात. हा पुरस्कार ज्यांनी माझ्यावर वारकरी विचारांचे संस्कार केले त्या माझ्या मातापित्यांना व वासुदेव खंदारे गुरुजी, डॉ. नारायण म. जाधव यांना अर्पण करीत आहे.’’ यावेळी डॉ. डुंबरे यांनी पुरस्काराची रक्कम आळंदी येथील ज्ञानेश्वरीच्या संपादन व संशोधनासाठी पुणे नगर वाचनालयाला प्रदान केली.
या प्रसंगी कोकणात वाचन चळवळ रुजविणाऱ्या गिरीधर साठे यांना वाचन चळवळ कार्यकर्ता पुरस्कार तर दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या रुपालीताई पाठक यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. प्रसाद जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. स्वाती ताडफळे यांनी प्रास्तविक केले. तर, मधुमिलींद मेहंदळे यांनी आभार मानले. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने पुणेकरांनी हजेरी लावली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

