ओझरच्या सरपंचांवरील अविश्‍वास ठराव मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओझरच्या सरपंचांवरील
अविश्‍वास ठराव मंजूर
ओझरच्या सरपंचांवरील अविश्‍वास ठराव मंजूर

ओझरच्या सरपंचांवरील अविश्‍वास ठराव मंजूर

sakal_logo
By

ओझर, ता. १६ : ओझर नंबर १च्या (ता. जुन्नर) सरपंच मथुरा राजेंद्र कवडे यांच्या विरोधातील अविश्‍वास ठराव मंजूर झाला.
ओझर नंबर एकच्या सहा ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांवर अविश्वास ठरावाची मागणी तहसीलदारांकडे केली होती. त्यानुसार जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी गुरुवारी (ता. १६) अविश्वास ठरावाबाबत सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष ग्रामसभा बोलावली होती. ग्रामपंचायत कार्यालयात सदरची ग्रामसभा झाली. त्यामध्ये सरपंचांच्या विरोधातील तक्रारींबाबतच्या चर्चेनंतर मतपत्रिकेवर गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. त्याच ठिकाणी पार पडलेल्या मतमोजणी प्रक्रियेनंतर अविश्वास ठरावाच्या बाजूने सहा; तर अविश्वास ठरावाच्या विरोधात एक सदस्याने मतदान केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे सरपंच कवडे यांच्या विरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेमध्ये बहुमताने मंजूर केल्याचे तहसीलदार सबनीस यांनी जाहीर केले. त्यावेळी जुन्नर तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक सोमनाथ वायाळ व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.