

ओझर, ता.२६ : जुन्नर तालुक्यात उन्हाळी कांदा लागवडी वेगात सुरू आहे. येथील शेतकरी पारंपरिक पद्धतीबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे पहावयास मिळते. सध्या मल्चिंग पेपरचा वापर करून कांदा लागवड केली जात आहे.
जुन्नर तालुक्यातील सावरगाव, वडज, निमगीरी, निमगाव, धामणखेल या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर मल्चिंग पेपरचा वापर करून कांद्याची लागवड केल्याचे पहावयास मिळते. या पद्धतीत कमी कमी पाण्यात उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. जमिनीची मशागत करून गादी वाफ्यावर ठिबकच्या नळ्या अंथरूण त्यावर चार इंच अंतरावर छिद्र असलेला पेपर अंथरला जातो. पाणी दिल्यानंतर जमिनीच्या वापसा अवस्थेत रोपांची लागवड केली जाते. या पद्धतीमुळे खुरपणी, तणनाशक फवारणीचा खर्च कमी होतो. तसेच कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळते. या पध्दतीमुळे कांदा पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच एकसारख्या अंतरावर लागण झाल्याने एकसारख्या आकाराच्या कांद्याचे उत्पादन मिळते. पिकावर बाह्य वातावरणाचा, उन्हाचा थेट परिणाम न झाल्यामुळे उत्तम रंगाच्या आणि टिकाऊ कांद्याचे उत्पादन मिळते.
कांदा पिकाच्या सिंचनासाठी पाटपाण्याचा वापर करून सरी, वरंबा, वाफा, बियाण्यांची पेरणी अशा विविध पद्धतीने कांदा लागवड केली जात आहे तसेच ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर करून उत्पादन घेतले जाते. पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या परिसरात केली जाते.
01055
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.