शिरोली बुद्रूक शाळेत २९ वर्षांनंतर भरला वर्ग

शिरोली बुद्रूक शाळेत २९ वर्षांनंतर भरला वर्ग

ओझर, ता. ५ : शिरोली बुद्रूक (ता. जुन्नर) येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील १९९४-९५च्या एसएससी बॅचचे दहावीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व त्यांचे सर्व शिक्षक, सेवक स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने तब्बल २९ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर एकत्र आले होते.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मंदिरासमोरील मैदानाच्या कडेला वृक्ष लागवड केली. तसेच, यंदाच्या वर्षी सर्वांनी मिळून १९९५ वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. मुलींनी शाळेच्या प्रवेश द्वाराजवळ आणि वर्गखोली समोर आकर्षक रांगोळी काढली होती. शिक्षकवृंद वर्गात येताच सर्वांनी उभे राहून त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवर शिक्षकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

दीप प्रज्वलन करून विद्येची देवता सरस्वती, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेचे संस्थापक बाबूराव घोलप, माजी खासदार स्व. निवृत्तिशेठ शेरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व विद्यार्थिनींनी आपल्या गुरुजनांचे पूजन करून औक्षण केले. सर्वांना भेटवस्तू, गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे त्यावेळचे मुख्याध्यापक दिनकर पाचे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित शेरकर यांनी केले. यावेळी अनंतराव पोखरकर, सोपान गोडसे, रामचंद्र डुंबरे, कांडाजी ढोले, सीताराम येंधे, विष्णुपंत साबणकर, रेखा संभूस, शोभा गायकवाड, सुधीर दांगट, लक्ष्मण थोरवे, रामचंद्र अय्यर, सुनील कुलकर्णी, रमेश पांडे, आबा वरघडे, हरिभाऊ मुंडे, कैलास बोभाटे, विकास गोंजारी आदी उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक प्रसाद हांडे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. व्ही. राऊत कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

स्नेहमेळाव्यासाठी विविध क्षेत्रातून ऐंशीहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल थोरवे व विद्या ढोले यांनी केले तर महेंद्र थोरवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com