

कवठे येमाई, ता. १ : मलठण (ता. शिरूर) येथे अष्टविनायक महामार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सुरेश दादाभाऊ बोऱ्हाडे (वय ३९, रा. सोनेसांगवी, ता. शिरूर) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ३१) सकाळी ११च्या सुमारास घडली. सुरेश बोऱ्हाडे हे त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एम.एच. १२ ई.एस. ७९२) मलठण येथून सोनेसांगवीकडे जात असताना रस्त्यावरील वळणावर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी लोखंडी खांबाला जाऊन धडकली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित केले. याबाबत योगेश दादाभाऊ बोऱ्हाडे (वय ३६, रा. सोनेसांगवी) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस हवालदार शरद वारे करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.