आठ हजार ७७० पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण
पाबळ, ता. २३ : ‘छत्रपती शिवाजीमहाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या सेवा हमी पंधरवड्यात मंगळवारअखेर (ता.२३) जिल्ह्यातील आठ हजार ७७० शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण केल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
सर्वेक्षणात जुन्नर तालुका आघाडीवर असून तेथे दोन हजार ९८६ रस्त्यांची नोंद झाली आहे. याशिवाय आंबेगाव १ हजार ९९६, शिरूर १ हजार ७७, पुरंदर २४०, वेल्हा ३७९, भोर ३२१, बारामती ३०८, इंदापूर १५६, खेड १५९, मावळ २७३, मुळशी २८२, हवेली १६५, पिंपरी-चिंचवड ५, लोणी काळभोर १८५ आणि दौंड २३८ रस्त्यांचे सर्वेक्षण झाले आहे. तसेच, या अभियानात शेतीसाठी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने २६५ संमतीपत्रे घेण्यात आली असून, ४१४ शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन पूर्ण करण्यात आले आहे.
पाच हजाराहून अधिक रस्त्यांचे सांकेतांक निश्चित
‘छत्रपती शिवाजीमहाराज महाराजस्व अभियान’ या मोहिमेत आतापर्यंत पाच हजार ७१ रस्त्यांचे सांकेतांक निश्चित केले आहेत. त्यामध्ये जुन्नर तीन हजार ५५६, शिरूर ९३६, आंबेगाव ४५, दौंड १५९, इंदापूर १५६, भोर ९७, खेड ७३, बारामती ११, पुरंदर ८, लोणी काळभोर ८, वेल्हा ५, मावळ ४, मुळशी ४, हवेली ४ आणि पिंपरी-चिंचवड ५ यांचा समावेश आहे.
रस्ता लोकअदालतीत ८९ प्रकरणे निकाली
शेतरस्त्यांवरील वाद सोडवण्यासाठी जिल्ह्यात २०४ रस्ता लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यामधून एकूण ८९ प्रकरणे निकाली काढली आहेत. यामध्ये शिरूर तालुक्यात ८०, आंबेगाव २९, मुळशी १२, मावळ १२, हवेली १५, बारामती ११, खेड ११, पुरंदर ८, वेल्हा ७, भोर ६, जुन्नर ४ आणि दौंड ९ अशा एकूण २०४ लोकअदालतीचे आयोजन केले होते.
01453
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.