मलठणला रोहित्र फोडून 
तांब्याच्या तारांची चोरी

मलठणला रोहित्र फोडून तांब्याच्या तारांची चोरी

Published on

कवठे येमाई, ता. १३ : मलठण (ता. शिरूर) येथे चोरट्यांनी शेतातील विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा आणि आॅईलची चोरी केल्याची घटना बुधवारी (ता. १२) रात्रीच्या सुमारास घडली. यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ इंद्रजित दामोधर खरसाडे (रा. मलठण) यांनी याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
बुधवारी (ता. १२) सकाळी स्थानिक शेतकरी विश्वास दंडवते हे शेतात गेले होते. यावेळी त्यांना शेतातील विद्युत रोहित्र फोडलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. महावितरणच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता चोरट्यांनी रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा व आॅईल लंपास केल्याचे उघड झाले. यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अरुण उबाळे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com