रिक्त पदांचे व प्रशासकीय दिरंगाईचे कायमच ग्रहण मलठणच्या बंद दवाखाना बनला तळीरामांचा अड्डा
सागर रोकडे : सकाळ वृत्तसेवा
कवठे येमाई, ता. १८ : मलठण (ता. शिरूर) येथे पशुवैद्यकीय दवाखाना असूनही तो गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून बंद पडला आहे. रात्रीच्या वेळी हा परिसर तळीरामांचा अड्डा बनत आहे. परिसरात दारूच्या बाटल्या, कचरा यांचा ढीग दिसून येत आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात गवत उगवले असून भटके कुत्रे, उंदीर, घुशी फिरत आहेत. परिणामी दवाखान्याभोवती मोठ्या प्रमाणात घाण पसरली .आहे
दवाखान्याची इमारत १९९७-९८ मध्ये उभारली होती. सध्या तिची पूर्णतः दयनीय अवस्था झाली आहे. या दवाखान्याला समस्या, रिक्त पदांचे व प्रशासकीय दिरंगाईचे कायमच ग्रहण लागले आहे. येथील सर्व पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कान्हूर मेसाई येथील मूळ पदभार असलेले पशुधन पर्यवेक्षक अनिल सूर्यवंशी हे मलठणचे अतिरिक्त कामकाज पाहत आहेत.
दवाखान्याच्या समोरील जागेत ग्रामपंचायतीने उभारलेले सार्वजनिक स्वच्छतागृह अत्यंत अस्वच्छ अवस्थेत आहे. काहीजण दवाखान्यासमोरील मोकळ्या जागेचा लघुशंका व कचरा टाकण्यासाठी वापर करीत आहेत.
दवाखान्याच्या इमारतीची छत, दरवाजे-खिडक्या, कंपाऊंड यांची मोठी पडझड झाली आहे. दवाखाना पूर्णतः बंद असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अतिरिक्त पदभार असलेले सुर्यवंशी हे चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र तीन ठिकाणचा अतिरिक्त पदभार व अपुऱ्या सोयी सुविधा यामुळे त्यांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांना पशुधनांवर उपचारासाठी वेळ व पैसा खर्च करून खासगी दवाखान्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. दवाखान्याच्या स्थितीबाबत लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केले असूनही प्रशासनाकडून सातत्याने डोळेझाकच केली जात आहे, यामुळे पशुपालक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
याची आहे गरज
- दवाखान्यासाठी व निवासासाठी नवीन इमारत
- दवाखान्यासाठी संरक्षण भिंत
- पशुधन विकास अधिकारी, पर्यवेक्षक आदी रिक्त पदे
- ग्रामपंचायतील बांधलेले स्वच्छता गृह हटविणे
- दवाखान्यात आवश्यक साधन सामग्री आवश्यक
- पाण्याची टाकी, स्वच्छता गृह व परिसर स्वच्छता
मलठण येथील दवाखान्याची इमारत जरी बंद असली तरी कान्हूर मेसाई व कवठे येमाई येथील दवाखान्यातून उपलब्ध असणारी विविध प्रकारची सुविधा, औषधे,. जंतनाशके, मिनरल मिक्सचर, चाटण, विटा इत्यादींचा शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. दवाखान्यात उपलब्ध असलेल्या उच्चप्रतीच्या वीर्य मात्रा वापरूनच माजावर आलेल्या पशुंचे कृत्रिम रेतन करून घ्यावे. जेणेकरून संकरित गाईपासून पैदास होणाऱ्या कालवडी जास्त दूध देतील. तसेच मलठण येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीची दुरुस्ती व परिसराची स्वच्छता व्हावी याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. तसेच दवाखान्याच्या समोरील स्वच्छतागृह हटविण्याबाबत ग्रामपंचायत ला पत्रव्यवहार केला आहे.
- अनिल सूर्यवंशी, पशुधन पर्यवेक्षक, अतिरिक्त पदभार मलठण
पशुधन संख्या :
गाई...........२६३४
म्हशी...........४०३
मेंढी...........१२९९
शेळी...........९४७
एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
कृत्रिम रेतन संख्या..........४५
वंध्यत्व निर्मूलन संख्या........११०
गर्भधारणा तपासणी....६०
लसीकरण
लाळ्या खुरकूत ..........२८५०
लंपी.......... २३५०
पीपीआर/इटी (मेंढी व शेळी).. १२००
रेबीज........११
घटसर्प...९००
फऱ्या...१००
दृष्टिक्षेपात दवाखाना
आतापर्यंत २८ जनावरांवर लंपीचे लसीकरण
वैरण बियाणे वितरणासाठी५० अर्ज प्राप्त
चारा उत्पादन क्षेत्र.....९५६ हेक्टर
गावातील सिंचित ओलिताखाली क्षेत्र.......६२३ हेक्टर
वार्षिक चारा (टनांत)
हिरवा...९७ टन
वाळलेला.....१६५० टन
दवाखान्यातील रिक्त पदे
पशुधन विकास अधिकारी - १
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी - १
पशुधन पर्यवेक्षक - १
01565
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

