Thur, March 30, 2023

पाईटला दाखल्यासाठी विशेष शिबिर
पाईटला दाखल्यासाठी विशेष शिबिर
Published on : 10 February 2023, 10:04 am
पाईट, ता. १० : येथील सोमनाथ मंगल कार्यालयामध्ये जातीच्या दाखल्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार व पाईटचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच तहसील कार्यालय खेड यांच्यावतीने पिंपरी पाईट गटातील आदिवासी समाजासाठी गुरुवार (ता. १६) सकाळी १० वाजता पाईट येथे होणार आहे. फॉर्म आणि इतर माहितीसाठी सुरेश काळे यांच्या मोबाईल नंबर (९९२१२६७८१३) वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.