आंबोली वनविभागाच्या वतीने वणवे रोखण्यासाठी जनजागृती

आंबोली वनविभागाच्या वतीने वणवे रोखण्यासाठी जनजागृती
Published on

पाईट, ता.१८ : जुन्नर वनविभांतर्गत येणाऱ्या चाकण वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ आंबोली वनविभागाच्या वतीने वणवे लागू नयेत यासाठी जनजागृती करण्यात आली. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अज्ञातांकडून वणवे लावण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे वन वणव्याबाबत चित्रफीत दाखवून, माहिती पत्रके वाटण्याची मोहीम राबविण्यात आली.
जनजागृती कार्यक्रम वांद्रे, आंभू, भलवडी, तोरणे खुर्द, विराम, तांबडेवाडी, आढे व इतर ठिकाणी उपवनसंरक्षक जुन्नर अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण संतोष कंक यांचे मार्गदर्शनाखाली पार पडला. त्यावेळी वनपाल संतोष चंद्रकांत आगरकर, आंबोली वनरक्षक ओ. व्ही पवार, तोरणे खुर्द वनरक्षक जगताप व ठिकठिकाणचे ग्रामस्थ, तरुण, शालेय विद्यार्थी, महिला मंडळे, बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
आगीमध्ये सरपटणारे प्राणी, पशुपक्षी, वन्यप्राणी, झाडांना नुकतीच फुटलेली पालवी, रानमेव्याची झाडे आदी वनसंपादा खाक होत आहे.

दरम्यान, वणव्याबाबत वनअधिनियम १९२७ ची सविस्तर माहिती व गुन्हा नोंद तसेच इतर शासकीय कारवाईपर्यंतची सर्व माहिती, तसेच वणव्यांपासून वनांचे संरक्षण कसे करायचे याबाबत देखील उपस्थितांना माहिती देण्यात आल्याचे आगरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com