
मापोली येथे गणेश जयंती उत्साहात
फुलवडे, ता. २५ : मापोली (ता. आंबेगाव) येथे श्री गणेश विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने मंगळवार, बुधवार रोजी श्री गणेश जयंती उत्सव तसेच तृतीय वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन केले होते.
यानिमित्त हरिपाठ, हरिकीर्तन, संगीत भजन, होमहवन, श्रींचा अभिषेक व महाआरती त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हभप साधना कोरडे यांची किर्तनसेवा पार पडल्यानंतर सन्मान सोहळ्यात युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खरात, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाचे उपाध्यक्ष व दैनिक सकाळचे बातमीदार अविनाश घोलप, पाच मिनिटात ९६ गणिते सोडवून पुणे विभागात प्रथम आलेला सुवांश प्रदीप कुऱ्हाडे यांचा श्री गणेश विश्वस्त मंडळ व समस्त ग्रामस्थ मापोलीकरांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यासाठी कोरोना योद्धे गणेश जनार्दन लोहकरे यांच्या स्मरणार्थ शिवाजी जनार्दन लोहकरे, माजी सरपंच तान्हाजी राक्षे यांनी भाविकांना अन्नदान केले. याप्रसंगी श्री गणेश विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद कोकणे, उपाध्यक्ष रामचंद्र लोहकरे, पंचायत समिती सदस्या इंदूबाई लोहकरे, मापोलीच्या सरपंच शीला लोहकरे, शरद बँकेचे संचालक प्रदीप आमुंडकर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन हभप अनंत महाराज लोहकरे यांनी केले होते.