पाटण पशुवैद्यकीय दवाखान्याकडून कुशिरे दत्तक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटण पशुवैद्यकीय दवाखान्याकडून कुशिरे दत्तक
पाटण पशुवैद्यकीय दवाखान्याकडून कुशिरे दत्तक

पाटण पशुवैद्यकीय दवाखान्याकडून कुशिरे दत्तक

sakal_logo
By

फुलवडे, ता. २३, पाटण (ता. आंबेगाव) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत कुशिरे हे गाव कामधेनू दत्तक ग्राम योजनेअंतर्गत बुधवारी (ता. २२) दत्तक घेण्यात आहे. पशुपालकांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरामध्ये पाटण येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. पूजा बोंबले यांनी माहिती दिली.
गाई व म्हशींच्या दूध उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ व्हावी यासाठी कामधेनू दत्तक ग्राम योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यातील विविध जिल्हा परिषदांमार्फत राबविण्यात येत आहे. याअंतर्गत कुशिरे गाव दत्तक घेण्यात आले आहे.
दरम्यान, गोपूजनाने शिबिरास सुरुवात झाली. यामध्ये जंत, गोचीड निर्मूलन, वंध्यत्व निवारण, रोग निदान, मलमूत्र सांडपाणी व्यवस्थापन, निकृष्ट चारा सकस करणे, उन्हाळ्यात भासणारी चाराटंचाई कशी दूर करता येईल तसेच अझोला व हायड्रोपोनिक मका बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवून जंतनाशक, गोमाश्या निर्मूलनासाठी जंतनाशक व गोचीड नाशक गोळ्या, फवारणीच्या औषधांचे वाटप करण्यात आले.
आंबेगावच्या पश्चिम भागातील पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत साळवे, डॉ. युवराज रघतवान, डॉ. मिलिंद भोईर, डॉ. रूपेश खामकर, डॉ. मधुकर सुरकुले, डॉ. संदीप हिंगे, डॉ. प्रशांत कर्डिले, डॉ. ओंकार दाते, डॉ.सचिन भोईर, प्रभाकर पन्हाळे, दत्ता मेचकर, सोपान मोरमारे, सुधीर लोहकरे, अश्विनी काळे यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कुशिरेचे सरपंच चंद्रकांत भोईर, दिलीप मुदगुण, उपसरपंच अमोल दाते, ग्रामसेवक मंगेश केंगले, लाडबा देठे, हैंबत धादवड, शिवाजी धादवड, दिनेश धादवड, चिंतामण दाते, ब्रम्हा हेमाडे, गणेश भोईर, सखूबाई दाते, मंगल दाते तसेच पशुपालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
......................................


01979