गाडेवाडी परिसरात आढळले गव्हाणी घुबड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाडेवाडी परिसरात आढळले गव्हाणी घुबड
गाडेवाडी परिसरात आढळले गव्हाणी घुबड

गाडेवाडी परिसरात आढळले गव्हाणी घुबड

sakal_logo
By

फुलवडे, ता. ३ ः राजपूर (ता. आंबेगाव) येथील शासकीय आश्रमशाळा गाडेवाडी परिसरात जखमी अवस्थेत असलेले गव्हाणी घुबड वनपाल कांता भारमळ यांना आढळले. त्यांनी या पक्षाला उपचारासाठी तळेघर (ता. आंबेगाव) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. त्याठिकाणी पशुधन विकास अधिकारी युवराज रघतवान यांनी या पक्षाची तपासणी केली असता त्यांना घुबडाच्या पंखाचे हाड मोडलेले आढळून आले. त्यावर त्यांनी शस्त्रक्रिया करून घुबडाला वनविभागाच्या ताब्यात दिले.
याप्रसंगी डॉ. मधुकर सुरकुले, डॉ. सचिन भोईर, प्रभाकर पन्हाळे, सोपान मोरमारे, सुधीर लोहकरे, अश्विनी काळे यांनी सहकार्य केले.