जांभोरी येथे पुरस्कार वितरण

जांभोरी येथे पुरस्कार वितरण

Published on

फुलवडे, ता. ३ : जांभोरी (ता. आंबेगाव) येथे जांभोरी ग्रामविकास फाउंडेशनच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार वितरण व प्राथमिक शाळा तसेच न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष पुनाजी पारधी यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जांभोरीच्या सरपंच सुनंदा पारधी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास बनसोडे उपस्थित होते. याप्रसंगी बी.डी. काळे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य इंद्रजित जाधव, मनोहर मोहरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आयकर विभागाचे उपआयुक्त प्रकाश केंगळे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वह्यांचे, छत्री व अंगणवाडीतील बालकांना पाटी व पेन्सिलचे वाटप केले. दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रुपये बक्षीस देण्यात आली. तसेच स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. सर्व विद्यार्थ्यांना मनोहर केंगले यांनी स्नेहभोजन दिले.


यावेळी लिंबाजी केंगले, शामराव बांबळे, संजय केंगले, बाळू केंगले, दुंदा भोकटे, नवनाथ केंगले, पांडुरंग केंगले, अंकुश केंगले, शरद बांबळे, सुनील गिरंगे, दिलीप गिरंगे, मुख्याध्यापक काळूराम केंगले आदी उपस्थित होते. किरण भवारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले; तर शिवराम केंगले यांनी प्रास्ताविक केले. व ज्ञानेश्वर पारधी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.